देवाच्या शब्दात प्रेरणा मिळवा
लेखक या पत्राचा लेखक प्रेषित योहान आहे. तो स्वतःचा 2 योहान 1 मध्ये वडील म्हणून वर्णन करतो. पत्राचे शीर्षक योहानाचे दुसरे पत्र आहे. प्रेषित योहानाचे नाव धारण करणाऱ्या 3 पत्राच्या मालिकेतील हे दुसरे पत्र आहे. योहानाचे दुसरे पत्र याचे लक्ष हे आहे की खोट्या शिक्षकांनी योहानाच्या मंडळ्यांमध्ये एक परिवर्तनाची सेवा चालविली होती, धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि ख्रिस्ती आदरातिथ्याचा फायदा त्यांच्या कारणास्तव पुढे नेण्यासाठी केला. तारीख आणि लिखित स्थान साधारण इ.स. 85 - 95. कदाचित लिखित स्थान इफिस असेल. प्राप्तकर्ता योहानाचे दुसरे पत्र हे एक पत्र आहे ज्याला प्रिय स्त्री आणि तिची मुले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मंडळीला संबोधित केले आहे. हेतू योहानाने आपले दुसरे पत्र “स्त्री व तिची मुले” यांच्या विश्वासूपणाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि प्रेमाने चालत राहण्याकरिता आणि देवाच्या आज्ञेमध्ये राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लिहिले. त्यांनी खोटया शिक्षकांविरूद्ध तिला सावध केले आणि तिला कळवले की तो लवकरच भेट देणार आहे. योहान तिच्या “बहिणीला” देखील अभिवादन करतो. विषय विश्वास ठेवणाऱ्यांचा विवेक रूपरेषा 1. अभिवादन — 1:1-3 2. प्रेमात सत्य राखणे — 1:4-11 3. चेतावणी — 1:5-11 4. अंतिम अभिवादन — 1:12, 13
— 2 योहा.